देवळं आणि देव : तेंव्हा अन् आता
…जनावर काय नि देव काय, एकदा का माणसाळला, की मग तो पार ‘पाळीव’ होऊन त्याची सवय होते. आणि एकदा का सवय झाली, की मग त्याच्याबद्दलची भिती वाटेनाशी होते. देवाचं तेच झालंय. भिती नाहीशी झाली, आणि मग बरे कमी आणि वाईट जास्त असे सर्व व्यवहार देवाच्या साक्षीनेच केले जातात. क्वचितप्रसंगी अशा व्यवहारात देवाला भागिदार म्हणूनही घेतलं जाऊ लागलं. माणसाच्या माणूसकी प्रमाणे देवाची देवसकी गेल्यामुळे, देव भागीदार म्हणून खुशही होत असावा, हे त्याला भागिदार म्हणून घेतलेल्यांच्या होणाऱ्या उत्तरोत्तर प्रगतीवरून दिसतं, कारण त्या प्रगतीत भागिदार म्हणून देवाचा वाटाही वाढता असतो… […]