नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

कुठे चाललोय आपण ?

“झिंगाट” च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख.  लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

भाग – (२) – (ब) ईशान्य भारत : निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं. (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ;  किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (अ) /११

मोरे यांच्या लेखातील कांहीं statements च्या योग्यायोग्यतेची चर्चा केल्यानंतर, त्या लेखावरील प्रतिक्रियांचा विचार करणेंही आवश्यक आहे. (लोकसत्ता दि. १३ मे, लोकमानस ; १४ मे चा विशेष लेख ;       व २० मे आणि २१ मे च्या लोकसत्तामधील प्रतिक्रिया). भाग – (२) – (अ) निखील जोशी, बंगळूरु यांच्या प्रतिक्रियेबद्दल : तमिळनाडु , व आधीचा–काळ : निखिल जोशी यांनी […]

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन

मागील वर्षी नागपूरमध्ये रामनगर स्थित खुल्या मैदानात आम्ही, मनपा नागपूर यांच्या सौजन्याने 38000 लिटर पाण्याचा कृत्रिम तलाव तयार करून, नागपूरकरांना पर्यावरणाचा विचार करून या तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह केला. आमच्या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, व जवळपास 1600 ते 1700 गणपती लोकांनी या तलावात विसर्जित केले. या वर्षी सुद्धा आम्ही अनंत चतुर्दशीला लोकांना असेच आवाहान […]

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल […]

घालीन लोटांगण

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन  घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ? या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती […]

बाप्पा…

तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता? नैवेद्य दाखवल्यावर – आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब? असं म्हणाला असता? नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला, तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम, असं म्हणाला असता? अंधेरी वरून आलेल्या […]

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे   सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥   रत्नखचित […]

ओवाळूं आरती : भाग – ५/५

भाग – ५ आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही  आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या […]

गौरीचे आगमन

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा […]

1 57 58 59 60 61 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..