नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?

लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्‍या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ? […]

श्री रामरक्षा

पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे. संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . […]

आणि मी बरंच काही विसरलो !

माझ्या घरी टीव्ही आला.. आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो ! माझ्याकडे गाडी आली.. आणि मी चालायचं विसरलो ! माझ्याकडे एअरकंडिशनर आला.. आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो ! मी शहरात रहायला आलो.. आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो ! माझ्याकडे क्रेडिट – डेबिट कार्ड आलं.. आणि मी पैशाची किंमत विसरलो ! माझ्याकडे परफ्यूम आला.. आणि मी […]

बाजीराव-मस्तानी आणि मराठी अलंकार

बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे. मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे […]

चैत्रांगण : सुंदर रांगोळी

चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं. अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या […]

टाळावी खाण्याची विकृती – जपावी भारतीय संस्कृती

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो, पण जेवणापूर्वी ‘वदनी कवळ’ आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो, पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो, पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll हाताने वरण भात, ताक भात कालवून […]

समर्थ रामदास स्वामी – भाग १०

सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो […]

जागतिक महिला दिनाचा इतिहास

दरवर्षी ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. हीच तारिख का? आणि हा दिवस कधीपासून साजरा व्हायला लागला? जरा बघूया इतिहासात डोकावून. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन […]

कृतज्ञता ब्रह्मांडाशी !

दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती […]

भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले. कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही […]

1 62 63 64 65 66 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..