आगर व आगरी : एक धांडोळा
प्रास्ताविक : माझें शैशव गेलें महाराष्ट्रातल्या ‘देशा’वर (घाटावर) , आणि त्यानंतर मी होतो शिक्षणासाठी मध्य प्रदेश व बंगालमधें. (इथें, ‘देशावर’ म्हणजे, कोकणवासी ज्याला घाटावर म्हणतात, तो महाराष्ट्राचा पठारावरील प्रदेश. ‘देश’ म्हणजे भारतदेश ही संकल्पना इथें अभिप्रेत नाहीं). त्या काळात मला ‘आगर’ हा शब्द’ भेटला संस्कृत शिकतांना आणि मराठी भाषेत एक तत्सम शब्द म्हणून. सुप्रसिद्ध समाजसुधारक आगरकर […]