नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती. जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह’ हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची […]

भारतीय खाद्यसंस्कृती

कोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं. […]

रामायण कथा – वाली पत्नी तारा – एक कुशल राजनीतीज्ञ

वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे […]

“डे” आणि “दिनां”वर बोलू काही !

परत परत विसरून लक्षात ठेवण्यासाठीच बरीच वर्ष आपण नुसते ‘डे’ आणि ‘दिन’ साजरे करत आलो ! खरोखरच त्यात ओलावा होता का? प्रत्यक्ष कृतीतून का नाही दिसत? आणि लक्षात ठेवले जात त्यांचे महत्व? का होतो ‘दिन’ दीनवाणा? आणि ‘डे’ ‘नाईटा’ (काळोखा) सारखा ! सध्या ‘डे’ आणि ‘दीनां’चे नुसते इव्हेंट होताहेत ! इव्हेंट पुरते लक्षात राहते, पुन्हा उपड्या […]

एकत्र कुटुंबाचे फायदे

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते. श्री जितेंद्र रांगणकर यांचे सर्वच विषयावरील लेख खूप वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे असतात. […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल…

२१ जून २०१५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. योग हे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच फिटनेस सिक्रेट नसून केंद्रीय मंत्रीमंडळानेही त्याची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच की काय, केंद्रीय मंत्रीही आपल्या घरी योगाद्वारे फिटनेसचा फॉर्म्यूला वापरत असावेत. नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग दिनाबद्दल जनतेला आवाहन केले. त्यावेळी त्यांनी स्वतः घरी योगा करत […]

परदेशगमनाने काय मिळविले काय हरवले !

देशातील तरूण पिढी पाश्चिमात्य राष्ट्रांकडे का आकर्षित होते आणि त्या देशात कायम वास्तव्य करणे का पसंत करते याला अर्थकारण, समाजकारण आणि काहीअंशी राजकारण जबाबदार आहे असे म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. याचा अर्थ आपल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सिस्टिम मध्ये काहीतरी दोष आहे असे वाटते. कुटुंबातील एखादा मुलगा परदेशात गेला की परत येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे […]

वैदिक काळातील वीरांगना

ऋग्वेद वाचीत असताना, स्त्रीच्या पराक्रमाची एक गाथा सापडली. तिचे नाव कुणाला ठाऊक नाही, तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची […]

कबूतर जा जा जा

ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे. […]

1 66 67 68 69 70 74
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..