रामायण कथा – वाली पत्नी तारा – एक कुशल राजनीतीज्ञ
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे […]