मुंबई मराठी साहित्य संघ
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय मुंबईतून पुण्यात हलवण्यात आल्यावर मुंबईतही तशी एक मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणारी संस्था असावी, असा ठराव १९३४ सालच्या साहित्य संमेलनात करण्यात आला. त्याच्या फलस्वरूप २१ जुलै, १९३५ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना करण्यात आली. संस्थेचे पहिले कार्यालय संस्थापक डॉ अ.ना.भालेराव यांच्या गिरगावातील नारायण – सदन या निवासस्थानी सुरु झाले. […]