जागतिक व्यंगचित्रकार दिन
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. […]
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. […]
संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे. […]
२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. […]
चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते. […]
सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो. […]
संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला. […]
जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!! […]
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते. […]
केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या पहिली लेडीज स्पेशल लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी विरारहून सकाळी पहिली लेडीज स्पेशल लोकल सुटली. तेव्हापासून गेली २८ वर्षं ही लेडीज स्पेशल रोज धावतेय. […]
हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन. सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू ४ मे रोजी झाला, जे की एक संत आणि फायर फायटर होते. असे म्हणतात की एकदा त्याच्या गावात आग होती, त्याने फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण गाव आग विझविली. त्यानंतर, युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी ४ मे रोजी फायर फाइटर दिवस साजरा केला जातो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions