नवीन लेखन...

बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण

अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]

परशुराम जयंती

हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता. […]

जागतिक अस्थमा दिवस

जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो.  […]

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप,होम,पितृतर्पण,दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते,असा शास्त्रसंकेत आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षातील तृतीया म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाला कृतयुगाचा प्रारंभ दिन मानतात. हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुर्ताचा दिवस. […]

दादरमधील शिवाजी मंदिराचा शुभारंभ

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. […]

२ मे १८७२ – भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे उद्‌घाटन

२ मे १८७२ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन करण्यात आले. डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय १८७५ साली जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्याआधी मुंबईत एखादे वस्तुसंग्रहालय असावे अशी कल्पना १८५० साली जन्मास आली. आणि त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन ‘व्हिक्टोरिया अॅ्ण्ड अल्बर्ट’ म्युझियम उभे राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर १९७५ साली […]

सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती

राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे.  […]

जागतिक कामगार दिवस

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. ‘लेबर किसान पार्टी हिंदुस्थान’ या संघटनेने हा दिवस पाळला होता. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता. […]

महाराष्ट्र दिन

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ हे नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’ असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.  […]

1 9 10 11 12 13 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..