सुवेझ कालव्याच्या बांधकामाची सुरुवात
सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती. […]