नवीन लेखन...

टायटॅनिक बुडाले

टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. अधिकृत आकडेवारी नुसार त्या दिवशी टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाच्या बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा त्यांचे वय फक्त २महिन्याचे होते. […]

जागतिक कला दिवस

इटलीचे लिओनार्डो दा विंचीच्या यांचा आज जन्मदिन असतो. म्हणून आज जागतिक कला दिन(वर्ल्ड आर्ट डे) साजरा करावा म्हणून निश्चित करण्यात आले. दा विंचीची जागतिक शांतता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता, बंधुता आणि बहुसंस्कृतीवाद तसेच इतर क्षेत्रात कला महत्त्व म्हणून निवडण्यात आले. […]

अग्निशमन दिवस

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. […]

‘झपाटलेला’ या चित्रपटाला २९ वर्षे झाली

अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे. […]

पुथंडु म्हणजेच तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण

दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला ‘चैत्तिरीई विशू’ असे म्हणतात. केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तामिळनाडू व्यतिरिक्त श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस आणि इतर देशांमध्येही पुथंडु साजरा केला जातो. […]

पिंगपाँग डिप्लोमसीची ५२ वर्षे

१९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा. […]

जागतिक पार्किन्सन दिवस

पार्कीन्संन्स साठी उपचाराचे महत्व असले तरी पार्किन्सन्सला स्वीकारून पार्कीन्संन्ससंह आनंदी जीवन जगण्याची कला शिकणे हे रुग्णासाठी सर्वात महत्वाचे ठरते. पिडीला समजुन घेउन स्विकाराची अवस्था जितक्या लवकर येईल तितके पीडिसह आनंदानी जगणे शक्य होते आणि ही स्विकाराची अवस्था लवकर येण्यासाठी आणि टिकण्यासाठी डॉक्टराच्या सल्ल्याबरोबर, त्याला साथ हवी असते जोडीदाराची,कुटुंबाच्या सहकार्याची,स्वमदत गटाची. […]

जागतिक होमिओपॅथी दिन

होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात. […]

जागतिक सिबलिंग डे

असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]

जागतिक कोकणी भाषा दिन

कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! […]

1 13 14 15 16 17 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..