नवीन लेखन...

प्रसाद प्रॉडक्शन्सच्या ‘खिलौना’ चित्रपटाची ५२ वर्षे

सनम तू बेवफा से नाम ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), खुश रहे तू सदा ( मोहम्मद रफी), खिलौना जानकर तुम तो ( मोहम्मद रफी), मै शराबी नही ( मोहम्मद रफी आणि आशा भोसले), रोझ रोझ रोझी ( किशोरकुमार आणि आशा भोसले) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे. […]

१८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी

माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. […]

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस

स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले. […]

डी. डी. १० मराठी उपग्रह वाहिनीचे ‘सह्याद्री’ असे नामकरण झाले

यंग-तरंग, कृषि-दर्शन, आमची माती आमची माणसे, आस्वाद, सखी सह्याद्री, हॅलो डॉक्टर, स्वस्थ भारत, पटलं तर घ्या, क्रीडांगण, म्युझिक मस्ती गप्पा गाणे (एम2 जी2) यासारखे मालिका आधारित कार्यक्रम, तसेच सह्याद्री अंताक्षरी, धिना धिन धा, दम दमा दम, नाद भेद, आजचे दावेदार – उद्याचे सुपरस्टार यासारखे विविध स्पर्धात्मक, रिऍलिटी शोज यासारख्या अनेकानेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे वर्षानुवर्षे मनोरंजन तर केले आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संपन्न संस्कृतीचे आणि परंपरांचे जागरणही केले आहे. […]

ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला.‌ त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली. […]

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिवस

स्वामी विवेकानंद म्हणतात- प्रार्थनेपेक्षा खेळ तुम्हाला देवाच्या जास्त जवळ घेऊन जाऊ शकतो. कारण प्रार्थनेमध्ये तुमचा संपूर्ण सहभाग असेलच असे नाही परंतु खेळात तो असतोच. वरील संदर्भ लक्षात घेता येथे नमूद करू वाटते की व्यक्तिमत्व विकासामध्ये बुद्धिबळाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच व्यक्तिमत्व विकास करण्याकरिता बुद्धिबळ हा खेळ आत्मसात करावा, जोपासावा, व्यासंग धरावा व त्याचे अनुसरण करावे. […]

जगातील पहिला मोबाईल कॉल मोबाईल फोनवरून केला गेला

३१ जुलै १९९५ रोजी भारतातील मोबाईल सेवा सुरू झाली. कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला, हा कॉल केला होता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी. मोबाइलचे जाळे देशात पहिल्यांदा कोठे अंथरले जाईल तर ते कोलकात्यामध्येच, हा त्यांचा हट्टाग्रह होता. ते सुरू झाले तेव्हा त्यांनी रायटर्स बिल्डींगमधून तेव्हाचे केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम यांना पहिला मोबाईल फोन केला. […]

जागतिक स्वमग्नता दिवस

नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. स्वमग्न मुलांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची. सोप्या शब्दात समजावयाचं म्हणजे, जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकात एकटे नेऊन सोडले तर? आपण गोंधळून जाऊ, आपल्याला त्या लोकांची भाषा समजणार नाही वा आपली त्यांना! अशावेळी आपली जी स्थिती होईल नेमकी तशीच स्थिती या स्वमग्न मुलांची असते. म्हणूनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यासारखी वागतात. बाह्य जगाशी यांचा काहीही संबंध नसतो. […]

मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे. […]

भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध झाली

या योजना काळात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी २.१ टक्क्यांनी वाढ घडवून आणण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी ३.६ टक्के म्हणजे एकूण योजना काळात १८ टक्के इतकी वाढ साध्य झाली. ही योजना हेरॉल्ड डोमार याच्या प्रतिमानावर आधारित होती. […]

1 14 15 16 17 18 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..