रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. […]