नवीन लेखन...

जागतिक क्षयरोग दिन

ट्युबरक्युलोसिस म्हणजे (क्षयरोग) हा संसर्गजन्य आजार असून , तो ‘मायकोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस’ या जंतूमुळे होतो. वाढत्या शहरीकरणामुळे अस्वच्छ परिसर , दाटीवाटीने वाढणार्या झोपड्या व जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते. […]

कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापनदिन

ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ.. […]

शहीद दिन

भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. […]

राष्ट्रीय दिनदर्शिकेचा केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकार केला

राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. […]

जागतिक जल दिन

पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध. […]

माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात

ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या. […]

जागतिक मुकाभिनय दिवस

मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. […]

‘ट्वीटर’ चा वाढदिवस

२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्‍‌र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले. […]

बिहार दिन

स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात ‘एक संपन्न प्रांत’म्हणून बिहारची ओळख होती. देशाच्या साखरेच्या उत्पादनाचा २५ टक्के वाटा, तांदूळ, गव्हाचे २९ टक्के उत्पादन होते. फळ-फळावळांचा ५० टक्के उत्पादनाचा वाटा बिहारचा ! ताग, कापड, तंबाखू उत्पादन करणारा गंगेच्या खोऱ्यातील प्रांत होता. […]

ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल

पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. […]

1 17 18 19 20 21 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..