नवीन लेखन...

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह

सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून मुंबई विधान परिषदेतील सदस्य रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मांडलेला एक ठराव संमत झाला होता. या बोले ठरावात असे म्हटले गेले होते की, ‘सार्वजनिक तळी, धर्मशाळा, मंदिरे, विद्यालये, न्यायालये आदी जी सरकारी खर्च वा अनुदानाने बांधली वा चालविली जातात, त्यात अस्पृश्यांना मुक्तखद्वार असावे.’ […]

जागतिक आनंद दिवस

आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत. […]

राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले

केळकर संग्रहालय पाहण्यासाठी तास-दोन तासांची सवड काढूनच जावे लागते. तेथे दिवे, अडकित्ते, वस्त्रप्रावरणे, दौती-कलमदाने, दरवाजे, स्त्रियांची सौंदर्यप्रसाधने, वाद्ये, शस्त्रास्त्रे, धातूंची भांडी, बैठे खेळ, पेटिंग्ज, कातडी बाहुल्या, लाकडी कोरीवकाम अशा पारंपरिक वस्तूंचा मोठा संग्रह आहे. त्या वस्तूंचे वर्गीकरण करून, तेथील पंधरा दालनांमध्ये त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. […]

जागतिक निद्रा दिन

शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. […]

‘बेगमबर्वे’ या नाटकाचा पहिला प्रयोग

बेगम बर्वे (१९७९) हे अनेकार्थांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय नाटक आहे. सामान्यतः एकत्र वा विभक्त कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव मराठीतील अनेक नाटकांच्या केंद्रस्थानी असतात. या नाटकात योजून चार व्यक्तिरेखा आहेत. त्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नाही. अनाम पण दृढ भावबंधांनी या व्यक्ती परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत असेही दिसत नाही. नाटकात रूढ अर्थाने नायक-नायिका नाहीत. चौघांपैकी जावडेकर, बावडेकर व शामराव हे तिघेजण मध्यमवयीन पुरुष आहेत. बर्वे बाह्यत: पुरुष आहे परंतु अंतर्यामी तो स्त्रीचे जीवन जगतो. […]

नो सेल्फी डे

नॉटिंगहॅम ट्रेन्ट विद्यापीठ व तामिळनाडूची त्यागराजर स्कूल मॅनेजमेंट या संस्थांनी २०१४ मध्ये सेल्फिटिसची चर्चा सुरू झाल्यानंतर याबाबत संशोधन सुरू केले. सेल्फिटिस हा मानसिक रोग असल्याचे वर्गीकरण पहिल्यांदा अमेरिकन सायकिॲ‍कट्रिक असोसिएशनने केले होते. आता सेल्फिटिस वर्तन हा रोग असल्याचे ठोसपणे सांगण्यात आले आहे. […]

‘कसोटी क्रिकेट’ ची सुरुवात

पहिला चेंडू टाकणारे होते इंग्लंडचे आल्फ्रेड शॉ. त्यांच्यासमोर होते ऑस्ट्रेलियन फलंदाज चार्ल्स बॅनरमन. त्यांनी त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसोटी क्रिकेटमधली पहिली धाव घेतली. त्यांनीच दुसऱ्या दिवशी पहिले शतक पूर्ण करताना १६५ धावा केल्या. या सामन्याला कसोटी दर्जा नंतर बहाल करण्यात आला. सुरुवातीला या सामन्याचे स्वरूप ऑल इंग्लंड वि. कम्बाइन्ड न्यू साउथ वेल्स अँड व्हिक्टोरिया इलेव्हन असे होते. […]

लिज्जत पापड (श्री महिला उद्योग) चा वर्धापनदिन

महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. १५ मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला. […]

ज्येष्ठ क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर

१९६२ साली भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिज चे गोलंदाज त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करायचे आणि त्या दौऱ्यात देखील अपेक्षेप्रमाणे त्यांनी तेज गोलंदाजी केली. परिणामी बरेच भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यात त्यावेळचे भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील समावेश होता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यावेळी परदेशी असलेल्या या भारतीय खेळाडूला रक्ताची गरज होती तेव्हा वेस्ट इंडिज चा खेळाडू फ्रॅंक वोरेल सर्वात आधी रुग्नालयात पोहचवला आणि इतकेच न्हवे तर त्याने रक्तदान देखील केले होते. […]

नॅशनल पोटॅटो चिप्स डे

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’ (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. म्हणून १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही. उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ […]

1 19 20 21 22 23 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..