६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. […]