‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ ची पहिली आवृत्ती
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा ‘शब्द’ ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली. […]