नवीन लेखन...

राष्ट्रीय किसान दिन

भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पार्श्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आर्थिक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. […]

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा वर्धापन दिन

२०१७ वर्षाच्या तुलनेत रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदा पाच स्थानांची झेप घेतली आहे. आता रिलायन्सच्या पुढे रशियाची गॅस कंपनी गेजप्रॉम आणि जर्मनीची ई. ऑन या दोन कंपन्या आहेत. […]

‘नटसम्राट’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५१ वर्षे

नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. […]

वर्षातील सर्वात लहान दिवस

२१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. […]

विच्छा माझी पुरी करा नाटकाचा पहिला प्रयोग

“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे. […]

जागतीक साडी दिवस

१९४२च्या आसपासचा काळ खादीच्या साड्यांनी भारला गेला, तर पन्नास-साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला! मधुबाला, नूतन यासारख्या सौंदर्यवती साडीत अतिशय मोहक दिसत. […]

उद्या पासून होणार ‘धनुर्मासारंभ’

सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ०४ ते ०६ या ब्रम्हमुहूर्तात उठून स्नान करून देवाची पूजाअर्चा, आराधना, भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात. या मासात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात. तसेच वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी प्रत्यक्ष देवता सूर्याची आराधना केली जाते. या आरतीला काकड आरती असे म्हणतात. […]

‘मेरा नाम जोकर’ चित्रपटाची ५१ वर्षे

‘मेरा नाम जोकर’ मध्ये विदूषक बनलेल्या राज कपूर यांनी चालीं चॅप्लीनचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांना हसता हसता रडविले. उत्तम आणि अर्थपूर्ण गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. […]

सेवानिवृत्त दिवस

सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. […]

राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण

१९०१ आणि १९०२ मधे भरपूर ग्लायडर्स बनवल्यावर आणि त्यांची बरीच हाडतोडू चाचणी उड्डाणं केल्यावर १९०३ मधे राईट जोडगोळीनं त्यांचं पहिलं इंजिनावर चालणारं विमान ऊर्फ “पॉवर्ड एअरक्राफ्ट” बनवलं. त्याचं नाव होतं “राईट फ्लायर -१.” […]

1 31 32 33 34 35 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..