MENU
नवीन लेखन...

रामदास बोट बुडली

१७ जुलै १९४७ चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता. […]

माउंट हिल्स डोंगरावर ‘HOLLYWOOD’ हा शब्द बसविला

पंचेचाळीस फूट उंच आणि साडेतीनशे फूट लांबीच्या या आकारात पांढऱ्या अक्षरात ‘HOLLYWOOD’ लिहिलेले आहे. हे लिहिण्याचा उद्देश येथील जागेच्या किंमती वाढवण्यासाठी होता सुरुवातीला याचा आकार पन्नास फूट उंच आणि तीस फूट रुंद होता, ज्याचा आकार नंतर च्या काळात वाढवण्यात आला. […]

जागतिक चॉकलेट दिवस

सुरुवातीला चॉकलेटची चव तिखट होती. ही चव बदलण्यासाठी यामध्ये मध, व्हॅनिलासोबत इतरही पदार्थ एकत्रित करुन यापासून कोल्ड कॉफी बनवण्यात आली. मग डॉक्टर सर हॅन्स स्लोन यांनी द्रव स्वरुपात असलेलं चाऊन खाण्यायोग्य बनवलं आणि त्याला कॅडबरी मिल्क चॉकलेट असं नाव देण्यात आलं. […]

स्लाइस्ड ब्रेडची बाजारात प्रथम विक्री

भारतात सुफी संगीतकार आणि कवी आमिर खुसरो यांच्या लेखनात पहिल्यांदा ब्रेडचा उल्लेख आढळला. मुघलांच्या राज्य काळात ब्रेडचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. पण हा ब्रेड मिडल ईस्ट म्हणजे इजिप्तवरुन आला होता. त्यानंतर पोर्तुगीज आणि इंग्रज आल्यावर पुन्हा ब्रेडमधे फरक पडला. यासाठी आपण गोव्यातल्या ब्रेडची तुलना मुंबईतल्या ब्रेडशी केली पाहिजे. कारण गोव्यातल्या ब्रेडवर पोर्तुगीज पद्धतीच्या ब्रेडचा प्रभाव आहे तर मुंबईच्या ब्रेडवर ब्रिटीश ब्रेडचा. […]

जागतिक बिकिनी डे

त्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली. […]

‘प्रभात चित्र मंडळ’ संस्थेचा स्थापना दिन

‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना १९६८ साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे. […]

अमेरिकेचा २४३ वा स्वातंत्र्यदिन

देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. […]

‘चौदहवी का चांद’ या चित्रपटाची ६२ वर्षे

हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. मोहम्मद सादिक दिग्दर्शित या चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. […]

स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस

इम्पीरियल बॅक ऑफ इंडियाचे १ जुलै १९५५ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयीकरण करून तिचे नामकरण ‘स्टेट बॅक ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. या बैंकेची यशस्वी वाटचाल आजतागायत सुरु असून वर्तमान स्थितीत स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या देशभरांत आज २०,००० पेक्षा जादा शाखा देशाच्या सर्व काना कोपऱ्यांत कार्यरत आहेत, सरकारचे रिझ्व्ह बँकेचे समाशोधन सारखे व्यवहार स्टेट बँकेमार्फत होतात. […]

ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेट चीनला परत दिले

पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. […]

1 3 4 5 6 7 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..