नवीन लेखन...

स्विगी चा स्थापना दिवस

स्विगी.! झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी..! १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली. यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी. या दोघांनी ‘बंडल’ […]

मेघमल्हार नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची ५४ वर्षे

शिवाजी मंदिर, मुंबई येथे पं. राम मराठे आणि डॉ. वसंतराव देशपांडे या दोन बुजुर्ग आणि घरंदाज गायक नटांच्या अदाकारीने गाजलेल्या आणि धीर धरी धीर धरी, धनसंपदा न लागे मला, गुलजार नार ही… अशा नाट्यपदांनी नटलेल्या ‘मेघमल्हार’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. […]

आंतरराष्ट्रीय बायोडीझेल दिवस

बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन. कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व […]

जागतिक आदिवासी दिवस

संयुक्त राष्ट्र संघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, ९ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२00५ हे […]

ऑगस्ट क्रांती दिन

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा […]

जागतिक मांजर दिवस

जागतिक मांजर दिवस हा २००२ पासून इंटरनॅशनल अनिमल वेलफेअर या संस्थेने साजरा करण्यास सुरवात केली. युरोप मध्ये १७ फेब्रुवारी व रशिया मध्ये १ मार्चला मांजर दिवस साजरा केला जातो. कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षिजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक […]

भारत छोडो चा ठराव पास – ८ ऑगस्ट १९४२

आजच्या दिवशी १९४२ साली भारत छोडो चा ठराव पास करण्यात आला. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली. चले जाव […]

बेस्ट दिन

दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली ‘बेस्ट’ सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी […]

सातवा राष्ट्रीय हॅन्डलूम दिवस

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते. हातमाग उद्योगाला अच्छे दिन खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत […]

‘मंगलगाणी दंगलगाणी’ ते चौरंग ची पस्तीस वर्षे

‘मंगलगाणी दंगलगाणी’ पासून सुरू झालेला अशोक हांडे यांच्या चौरंग चा प्रवास आज पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. ७ ऑगस्ट १९८७ रोजी सुरु झालेल्या ‘चौरंग’ या संस्थेने २०२१ पर्यत मंगलगाणी दंगलगाणी, गाने सुहाने, आजादी ५०, अमृत लता, मधुरबाला, अत्रे- अत्रे- सर्वत्रे, आवाज की दुनिया, माणिकमोती, गंगा जमुना, मराठी बाणा, मी यशवंत!, स्वर स्नेहल असे दर्जेदार कार्यक्रम रसिकांना […]

1 51 52 53 54 55 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..