मेघदूत काव्य
मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो. […]