नवीन लेखन...

पुण्यातील भारत सेवक समाजाचा वर्धापन दिन – १२ जून

गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. […]

जागतिक दृष्टीदान दिवस – १० जून

अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. […]

जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस

हा दिवस २००० साली प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरूवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन डॉइश हिरंटुमरहिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना १९९८ साली झाली. यामध्ये १४ देशांमधील ५०० हून अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशनने ८ जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरुकता आणण्यासाठी ८ जूनला हा दिवस साजरा केला जातो. […]

एअर इंडिया भारत इंग्लंड हवाई सेवा

८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती. […]

जागतिक महासागर दिवस

पृथ्वीच्या ७३ टक्के भागात पसरलेल्या महासागरांचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे, यासाठी काय-काय करता येईल, या दृष्टीने २००३ पासून जगभरात विचार सुरू झाला. ८ जुन रोजी ‘जागतिक महासागर दिन’ साजरा करण्याची कल्पना त्यातूनच जन्माला आली. […]

जागतिक अन्न सुरक्षा दिवस

७ जून २०१९ रोजी पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर २०१८ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे. […]

विश्वचषकातील पहिला सामना – ७ जून १९७५

७ जून १९७५ रोजी पहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळवण्यात आला. ७ जून ते २१ जून १९७५ दरम्यान खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या मालिकेला मुळात नाव ‘प्रुडेन्शियल कप’ असे देण्यात आले होते. या पहिल्यावहिल्या विश्वचषकात केवळ आठ संघांचा समावेश होता. […]

जागतिक पोहे दिवस

ज्या पोह्यांच्या साक्षीने लग्नगाठी जुळतात, त्या पोह्यांना आपल्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान आहे. सकाळचा नाश्ता पोह्यांशिवाय अधुरा आहे. म्हणूनच पोहेप्रेमी दरवर्षी ७ जून हा ‘विश्व पोहे दिवस’ म्हणून साजरा करतात. […]

जागतिक दुध दिन

भारतीय ग्रामीण भागातील विकासात धवल क्रांतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. कुरियन यांनी अनेक ग्रामीण भागात स्वाभिमानाने व स्वैराचाराने व्यवसायाला चालना दिली व दुधाचा महापूर घडवून आणला. स्वत: ला एक थेंब ही दुध आवडत नसणारे डॉ. कुरियन यांनी सहकार चळवळीतून धवल क्रांती साकारून दुग्ध व्यवसायातून ग्रामीण विकासाचे श्वासात आणि यशस्वी मॉडेल उभे केले. व्हर्गीस कुरीअन यांना जगात Milk Man म्हणून ओळखत असत. […]

दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे. […]

1 58 59 60 61 62 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..