नवीन लेखन...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टीचा वाढदिवस

आज राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७३ वर्षांची झाली आहे. लाल डबा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एस.टी बसची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली. […]

प्रभात फिल्म कंपनीचा ९२ वा वर्धापनदिन

प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९१ वर्ष होत आहेत. प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की, देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’. […]

२३ मे – जागतिक कासव दिन

कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. […]

‘लेडी विथ द लॅम्प’

परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं. […]

६ मे – आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस

पहीला नो डाएट दिवस इग्लंड मध्ये मैरी इवांस यांनी ६ मे १९९२ रोजी साजरा केला. १९९८ सालापासून ६ मे रोजी पूर्ण जगात हा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस पाळला जातो. […]

‘बॉम्बे’ ते मुंबई – २६ वर्षे

४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. […]

पाच फिल्म फेअर विजेता चित्रपट ‘ब्रह्मचारी’

भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती. […]

सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”

५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते. […]

शर्मिली चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव !

समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती. […]

1 59 60 61 62 63 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..