नवीन लेखन...

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

२५ एप्रिल १९८२ रोजी भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात झाली. १९८२ मध्ये भारतात झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की ! […]

बरसात चित्रपटाची ७२ वर्षे

राजकपूर यांनी बरसात या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. चित्रपट सर्वच दृष्टीने गाजला. राजकपूर यांचा बरसात चित्रपट म्हणजे ही जणू एक भावस्पर्शी कविताच होती. या चित्रपटामुळे राजकपूर यांच्या बहुढंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. २१ एप्रिल १९४९ रोजी बरसात चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजकपूरचे गुरू केदार शर्मा यांच्या मते ‘बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून बरसातचा उल्लेख करावा लागेल. […]

चतुरंग प्रतिष्ठानचा ४७ वा वर्धापन दिन

मुंबईतील गिरणगावात सुरू झालेली आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही संस्था. संगीत, नाटय़, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर १९७४ रोजी झाली. […]

जागतिक मलेरिया दिन

युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे १२०० मुले रोज मृत्यूमुखी पडतात. मलेरिया हा विषाणूंपासून संक्रमित होतो. अॅहनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही मलेरीया हा एक धोकादायक आजार ठरू शकतो. […]

महावीर जयंती

भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत म्हणून ते ओळखले जात. […]

एकावन्नावा वसुंधरा दिन

आज एकावन्नावा वसुंधरा दिन जगभर साजरा केला जात आहे. या वर्षीचा विषय आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’- पृथ्वीचे पुनर्जीवन करा. दर वर्षी २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत साजरा झाला. […]

सनदी सेवा दिवस

दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतात सनदी सेवा दिवस म्हणजेच National Civil Service Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. […]

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. […]

जागतिक संगीतोपचार दिन – २६ मार्च

जगभरात २६ मार्च हा दिवस जागतिक संगीतोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. संगीतोपचार हा एक स्वास्थ्यवर्धक उपाय आहे. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्‍या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. […]

‘मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. […]

1 60 61 62 63 64 75
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..