MENU
नवीन लेखन...

वर्षातील उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस

पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद ॲ‍डजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद ॲ‍डजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन ॲ‍गन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप ॲ‍डजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद ॲ‍घडजेस्ट केला जातो. […]

वेस्ट इंडिज संघाचा पहिला विश्वचषक विजय

क्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले. […]

जोसेफ सिरिल बमफोर्ड (जेसींबी)हे जगातलं पहिलं यंत्र बाजारात लाॅंच झालं

१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला. […]

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा वर्धापन दिन

मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले व २० जून १८८७ रोजी वापरण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. १८७८ मध्ये या […]

जागतिक निर्वासित दिवस

निर्वासितांच्या वेदनांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून संवेदनशीलता निर्माण व्हावी, निर्वासितांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, निर्वासितांच्या मूलभूत मानव अधिकारांचे रक्षण व्हावे या प्रमुख उद्दिष्टांसाठी हा करार करण्यात आला. […]

शिवसेना स्थापना दिवस

शिवसेना या संघटनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले. मा.प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीत अवघ्या १८ जणांच्या साक्षीने ‘शिवसेने’ची स्थापना झाली होती. मराठी माणसासाठी लढणारी आक्रमक संघटना यापुरतीच शिवसेनेची कार्यकक्षा सीमित होती. स्थापनेनंतर एक महिन्याने झालेल्या बैठकीत […]

पितृदिन

पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रासारखे विशाल, अथांग आहे. साऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसऱ्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा!’ बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आईसारखे घाय मोकलून रडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नाही. कारण, सर्वांचं सांत्वन त्यालाच करायचं असतं. […]

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यातील १४ फूट उंचीच्या पुतळ्याचे पासष्ठव्या वर्षांत पदार्पण

हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता. […]

‘महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तपत्राचा ६० वा वर्धापन दिन

यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. […]

1 5 6 7 8 9 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..