आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन
नोकरी करताना वेळ नाही हे पालुपद फक्त स्वत:च्या संदर्भात, बाकी इतरांसाठी धावतपळत ती सगळी कामं करतच असते. एवढंच कशाला, नोकरी करून निवृत्त झाल्यावरसुद्धा ती घरातली सारी कामं स्वत:वर ओढून घेते. इतकी वर्ष माझं तसं घराकडे दुर्लक्षच झालं म्हणत पोळ्या करणा:या बाईला सुटी देते. आपण आहे ना काम करायला, मग कशाला पैसे खर्च करा म्हणत कामच करते. स्वत:वर पैसे खर्च करण्याआधी दहादा विचार करते. स्वत:च्या ‘फिटनेस’साठी तर एक पैसा खर्च करायलाही तयार होत नाही. ती विचार करते, त्यापेक्षा मी घरात थोडं जास्त काम करेन. भाजी आणायला गेल्यावर थोडं जास्त चालायला जाईन. पण हे एवढंच करून ती फिट राहू शकत नाही. त्यासाठी रोज वेगळा वेळ काढून व्यायामच करायला हवा. आणि स्वत:कडे अजिबात दुर्लक्ष न करता स्वत:साठी वेळ काढायलाच हवा. […]