बोलीभाषेची कुचेष्टा थांबवा !
घरचं ‘पाणी’ शुद्ध आणि हाॅटेलातल्या ग्लासातलं ‘पानी’ अशुद्ध ? मराठीतला तोंच चणा हिंदीत चना होतो…भैय्या, पान्च्य (पांच नव्हे ना !) रुपये का चना देना)….आगला टेशन थाना (ठाणे नव्हे) .. खाना खानेको गये है.. हे जर आपण चालवून घेतो तर आपल्याच मराठी माणसांचे कांही आपल्याला न पटणारे उच्चार चालवून घ्यायला काय हरकत आहे ? ती त्यांची बोली भाषा असेल तर असूंदे. त्यांची इतकी टवाळी कां करावी ? […]