MENU
नवीन लेखन...

शैक्षणिक

पहिलं हिमायन

पृथ्वीवर आतापर्यंत अनेकवेळा हिमयुगं येऊन गेली आहेत. या हिमयुगांतलाच, पृथ्वी मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित असण्याचा काळ म्हणजे हिमायनाचा काळ. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, सर्वांत जुनं हिमायन हे सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी होऊन गेलं आहे. […]

इजिप्तमधले साप

इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत सापांना विशेष स्थान आहे. तिथल्या पौराणिक कथांत सापांच्या रूपांतील पात्रांचा वारंवार उल्लेख केला गेला आहे. उदाहरण द्यायचं तर अ‍ॅपोफिसचं देता येईल. पाताळलोकीचा हा राजा सापाच्या रूपात वावरत असे. मात्र इजिप्तमधील सापांचं महत्त्व हे फक्त अशा पौराणिक कथांपुरतं मर्यादित नव्हतं. […]

हरवलेला खंड

पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो. अस्तित्वात असलेले खंड नाहीसे होत असतात, तसंच नवे खंड निर्माण होत असतात. प्राचीन काळी असाच एक गोंडवना नावाचा महाखंंड अस्तित्वात होता. या महाखंडात आजचे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिआ हे भूप्रदेश सामावले होते. […]

स्वीडनमध्ये वही-पेन चा वापर

स्वीडनमध्ये आता लोकांना टॅब्लेट, संगणक आदी तांत्रिक, डिजिटल उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. या ऐवजी आता पुन्हा वही व पेन म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्याची याच शैक्षणिक सत्रापासून सुरुवात झाली आहे. […]

अतितप्त अ‍ॅल्टिप्लॅनो

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात. […]

जिवंत जीवाश्म

सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं. […]

स्फिंक्सची निर्मिती

इजिप्त हा देश पुरातन संस्कृतीच्या निदर्शक असणाऱ्या, विविध रचनांबद्दल प्रसिद्ध आहे. या रचनांतील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अर्थातच पिरॅमिड. परंतु पिरॅमिडबरोबरच तिथली जी आणखी एक लक्षवेधी रचना सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे गिझाचा ‘ग्रेट स्फिंक्स’. गिझाच्या सुप्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड’च्या जवळच, दक्षिण दिशेला वसलेला हा स्फिंक्स म्हणजे एक भव्य अश्मशिल्प आहे. […]

अँडिझवरचे उंदीर

अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते. […]

कुटुंब समृद्धी बाग आणि राहाणीमान

कुटुंब’समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार आले तरी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. […]

1 9 10 11 12 13 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..