डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ५
१८९५ ते १८९९ यादरम्यान रॉस व मॅन्सन यांच्यामधील १७३ पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. हजारो मैल एकमेकांपासून दूर असलेल्या या दोन संशोधकात पत्रांमधून संशोधनासंबंधीची अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हे सर्व बाड पोहोचण्यास कमीत कमी चार आठवडे लागत, यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस […]