नवीन लेखन...

शैक्षणिक

समाधान बाजारात विकत मिळत नाही

एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि […]

तयारी एन.डी.ए ची !

देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. […]

क्षण आनंदाचे

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय, निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का […]

पाथरवट ( दगड फोड्या) – झेन कथा

एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे आपला डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे. एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ… वरुन सूर्य आग ओकत होता.  दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखीतून मोठ्या […]

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या ! […]

भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा ‘नाविक’ 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस – IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस – ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे. या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी ‘नाविक’ असे केले आहे. इस्रोने आयआरएनएसएस 1जी (IRNSS-1G) […]

थोडीशी प्रेरणा – संघर्षयात्रा

ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती. ही कहाणी काल्पनिक नाही. सत्यघटनेवर आधारित माझा एका ध्येयवादी विद्यार्थ्याची आहे. […]

आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर

वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अ‍ॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. […]

MPSC च्या वाटेवर चालताना….

दैनंदिन जीवनात वावरताना खूप बदल घडवून आणलाय MPSC ने माझ्यात … मला कोणी विचारलं की तू एका वर्षात ठोस काय मिळवलं रे… त्याच उत्तर “शून्य” असू शकतं … पण मी काय मिळवलं ते मला माहितेय… कारण मला “दृष्टीकोन ” मिळालाय!! खूप up n downs येतात … कधी कधी चिडायला होतं तर कधी रडायला पण येतं… पण तेवढ्या पुरतं … कारण तेपण शिकवते की MPSC …!!! […]

द “बर्निंग” ट्रेन

ही पोस्ट बुलेट ट्रेन हवी का नको या चर्चेसाठी नाही.ती आताच का , बुलेट ट्रेन ऐवजी हे करा, ते का नाही करत या फंदात मला पडायचे नाही. हे मतप्रदर्शन नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट नक्की काय आहे त्याबद्दल फक्त माहिती देत आहे !! काल काही चॅनेल्सवर सुद्धा हे सांगितले. नेटवर सुद्धा माहिती उपलब्ध आहे. […]

1 125 126 127 128 129 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..