नवीन लेखन...

शैक्षणिक

गणेशमूर्ती आणि वाढत्या विकृती !

दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. […]

आडनांवं आणि जात – ही जोडी फोडणं अावश्यक

आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात. क्षणमात्रात नकळत घडणाऱ्या या प्रक्रियेत जात हा महत्वाचा मुद्दा असतो हे कोणीही प्रामाणिक माणूस नाकारणार नाही.. उदा. कोणत्याही कार्यालयात, विशेषत: सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त जाणं झाल्यास, ज्या अधिकाऱ्याकडे आपलं […]

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]

जरट्रड बेले एलियन – दुःखातून प्रेरणा

रसायनशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या जरट्रड बेले एलियन हिने कर्करोगावर उपाय शोधून काढला. तसेच हृदयविकार व पोटातील वायुविकारासंबंधी महत्त्वाचे संशोधन करून त्यासंबंधीची औषधे विकसित केली. त्याबद्दलच तिला १९८८ मध्ये शरीर-विज्ञानासंबंधीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. […]

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

गणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट

आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच ! […]

गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!

गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात. पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत […]

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

गुलाबाच्या झाडावरील काटे मोजत बसण्यापेक्षा त्याची सुंदर फुले मोजा. जो काटे मोजत राहतो त्यांच्यासाठी फुलेही काटेच बनतात. असं असतं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचं. तुम्ही जसा विचार करता तसेच घडता. रतन टाटा यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो.’ तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत […]

मराठी आपली आई,धर्म आपली माता

आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई,धर्म आपली माता.आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी,प्रसादपूर्ण,सहजबोधआहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात. ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते.तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी बोलताना फजिती होईन! आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून […]

आजीबाईंची शाळा

या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का.. ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. […]

1 127 128 129 130 131 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..