नवीन लेखन...

शैक्षणिक

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने

ख्रिस्ती वर्चस्व वाढण्याच्या काळात हीदन आणि पेगन (मूर्तिपूजक आणि निसर्गपूजक) लोकांना हालहाल करून ठार करण्यात आले वा बाटविण्यात आले. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. त्या काळात क्लॉडियस दुसरा हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्धे व बाहेरील आक्रमणे चालू होती. नित्य युद्धमान असलेल्या त्या देशाला तरुणांची सैन्यात भरती होण्याची आवश्यकता वाटू लागली. […]

हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

कोणी म्हणतोय भाजप जिंकला, कोणी म्हणतोय शिवसेना हरली, कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर, कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे, कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली… पण लक्षात ठेवा इथे फक्त  “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो… गुजराथी, मारवाडी, भैया, मद्रासी, सिंधी, पंजाबी, आणि हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”… आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल … महाराष्ट्रात राहून जर […]

आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट…!!!

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , “मागच्या आठवड्यात त्याला […]

‘सु’संवाद साधा !!

‘शादी का लड्डू’ खाऊन झालेल्यांना प्रत्येक वेळेस तो पचतो असं नाही. काही काळातच छोट्या छोट्या कुरबुरी सुरु होतात. या छोट्या छोट्या कुरबुरी दुर्लक्षित ठेवल्या तर काही काळातच मोठ्या कटकटी बनतात आणि हळूहळू त्या जोडप्यांत वादविवाद सुरु होतात. या अडचणी ठरवून केलेल्या लग्नांतच (arranged marriage) येतात असं नाही हं!! काही महिने ते काही वर्षं ‘डेटिंग’ नंतर झालेल्या […]

पासपोर्ट का आणि कशासाठी?

आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या […]

स्वयंपाकघरातील वेळेचे नियोजन

ओट्याशी उभं राहिल्यावर स्वयंपाक करताना वेळेचे नियोजन करुन आपल्याला वेळ वाचविता येतो. हा वेळ वाचविला तो प्रत्यक्ष स्वयंपाक करताना. पण स्वयंपाक करायच्या आधी बरीच पूर्वतयारी करावी लागते. त्यासाठी देखील बराच वेळ जातो. सकाळच्या वेळी हा वेळ पूर्णपणे वाचवता आला तर? फारच सुखाचं होईल. स्वयंपाकापूर्वीची बरीचशी तयारी आदल्या दिवशी रात्री टी.व्ही. पाहाता पाहाता आपण सहजपणे करु शकतो. […]

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी) स्थापना दिन

सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर […]

आर्मी डे

भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते. भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे. भारतीय लष्कराची […]

रेल्वे प्रवास करताना हे कराच…

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे. अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते. हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू […]

६ जानेवारी – पत्रकार दिन

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री […]

1 142 143 144 145 146 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..