इंग्रजी माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं
काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’.. पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या […]