MENU
नवीन लेखन...

शैक्षणिक

उपदेश सिंचन

‘ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.’ ‘अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.’ ‘साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.’ ‘पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?’ वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील? हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मुलांवर उपदेशांच्या […]

नाही ला नाही

लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात. मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न […]

मूल मित्र..

मूल मित्र.. घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात. मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील […]

न समजलेले नागरिक-शास्त्र

लहानपणी प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. वकील, आर्किटेक तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असत. स्वप्न नक्कीच चांगलीच आहेत पण तरीही कोणाला देशाचा चांगला नागरिक, चांगले आई-बाबा, पालक व्हावेसे वाटतेच ना? प्रत्येकाने स्वत:च्या आंतरमनात शिरून विचार करावा की मग असे लक्षात येईल की या सगळ्या स्वप्नांतून मी नक्की काय प्राप्त केले? मला […]

शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन !!!!!

पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस […]

मराठी भाषा आणि आपण

सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला ‘माझी आई’ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते. फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने ‘आपल्या आई’ विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला. […]

शुध्द आणि बेशुध्द !

कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने […]

मत, विश्वास आणि वास्तव

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. ‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले […]

काळाआड गेलेली लाकडाची खेळणी…!

महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]

गावोगावी गंमत शाळा

‘एकदा काही मुले गांधीजींना भेटायला गेली. गांधीजींनी मुलांना विचारले,’तुमचे शिकण्याचे माध्यम कोणते?’ काही मुले म्हणाली,’हिंदी’ तर काही मुले म्हणाली,’इंग्रजी’. गांधीजी म्हणाले,’अरे या तर आहेत भाषा! मी तुम्हाला शिकण्याचे माध्यम विचारतो आहे?’ आता मुले गोंधळली. मुलांना जवळ घेत गांधीजी म्हणाले,’अरे भाषा, गणित, विज्ञान असा कोणताही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही […]

1 151 152 153 154 155 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..