जगातील निरनिराळ्या कालगणना पध्दती
जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.
[…]