एका पुतळ्याची ‘कर्म कथा’
१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.
[…]