एलटीटीडी तंत्रज्ञान
सागरी जलाचे रूपांतर पेयजलात करून त्याचा वापर पिण्यासाठी, तसेच ऊर्जानिर्मिती प्रकल्पात करण्याचे तंत्रज्ञान आता नवीन राहिलेले नाही. समुद्राचे पाणी पाईपने आणणे त्यावर प्रक्रिया करणे व नंतर ते हव्या त्या ठिकाणी पुरवणे ही खर्चिक बाब मानली जाते, असे असले तरी चेन्नईच्या सागरी विज्ञान संशोधन संस्थेने या तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे. […]