नवीन लेखन...

शैक्षणिक

सकारात्मकता : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना. […]

वसई : पेहराव संस्कृती

सुरका : वसईकडील मच्छिमार समाजसमूहाच्या पुरुषवर्गाच्या पेहरावातील एक मुख्य प्रकार म्हणजे ‘ सुरका ‘ होय . ‘ जसा देश तसा वेश ‘ याप्रमाणेच जसा व्यवसाय तसा पेहराव हेदेखील आलेच . मत्स्य व्यवसाय करणाऱ्या या लोकांना मासेमारीसाठी बोटीतून खोल समुद्रात जावे लागते . उंच बोटीत चढउतार करावा लागतो . तसेच जाळी टाकण्यासाठी पाण्यातही उतरावे लागते . […]

पोलिओमुक्त विश्व

विश्वाच्या कल्याणासाठी पोलिओ जगताचा अनभिषिक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने महायुद्धात उतरलेला हा योद्धा कोण असेल बरे ! त्याची आयुधे आहेत सूक्ष्मदर्शकयंत्र , परीक्षा नळ्या , चंचुपात्र आणि युद्धभूमी आहे प्रयोगशाळा , तर शत्रू आहे पोलिओ . […]

पहिले विद्युत वाहन

पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या. […]

वसई : इतिहासातली आणि आजची

वसई तालुका ५२६ चौ . मैल इतका विस्तीर्ण आहे . पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र , उत्तरेला वैतरणा नदी , दक्षिणेला नायगावची खाडी . पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र यामध्ये वसलेला हा तालुका चहाच्या बशीसारखा ! त्यामुळे पोर्तुगिजांनी या प्रदेशाला ‘ बेकेम ‘ म्हटले तर ब्रिटिशांनी ‘ बॅसीन ‘ . पुढे स्वातंत्र्यानंतर वसई असे नामकरण झाले . या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . बौद्ध राजे ते थेट पोर्तुगीज , ब्रिटिशांनी येथे राज्य केले . […]

ऑर्किडचे रंगबिरंगी विश्व

सपुष्प वनस्पतींच्या मध्ये फुलांचे वेगवेगळे आकार, प्रकार, रंग, वास, अधिवास असतात. अगदी टाचणीच्या टोका पासून १-२ मीटर व्यास असणारी रेफ्लेशिया सारखी फुले बघायला मिळतात. त्यामध्ये ऑर्किडच्या फुलांची रंगविविधता, फुलांची आकर्षक रचना, मन मोहित करते. ऑर्किड फुलांची सौंदर्य, जटिलता आणि अविश्वसनीय विविधता वनस्पती जगात अतुलनीय आहे. या विदेशी सुंदरतेमध्ये पृथ्वीवरील फुलांच्या रोपांच्या सर्वात मोठ्या कुटूंबाचा समावेश आहे, […]

बॅड बॉसेस

तुम्ही साहेब (अधिकारी) असाल तर कशा प्रकारचे साहेब आहात? चांगले की वाईट? जसे तुम्ही तुमच्या स्टाफला पारखत असता तसेच तुमचा स्टाफही तुम्हाला जोखत असतो. तुमचा स्टाफ तुमचा सी. आर. लिहू शकणार नाही. म्हणून काय झाले? बॅड बॉस म्हणून एकदा नाव झाले की मग गूड बॉस होणे फार फार कठीण. […]

आपलं स्वयंपाकघर.. भाग पाच

चपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही. […]

आपलं स्वयंपाकघर.. भाग चार

स्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो. […]

1 2 3 4 159
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..