आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन
वह्या, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते. […]