डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत. […]