गुलामांचं बेट
‘सेंट हेलेना’ हे दक्षिण अटलांटिक महासागरातलं, आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूरवर वसलेलं, ब्रिटिश अधिपत्याखालचं एक छोटंसं बेट आहे. सुमारे १२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या बेटाचं, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासूनचं अंतर सुमारे दोन हजार किलोमीटर इतकं आहे. नेपोलिअन बोनापार्ट या फ्रेंच राज्यकर्त्याचं नाव जोडलं गेल्यानं, हे बेट सुपरिचित झालं. […]