नवीन लेखन...

शैक्षणिक

ग्लुकोज मीटर

मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात. […]

भारतीय शिल्पशास्त्राची सहा मुलतत्वे

ज्या भौतिक वस्तुच्या निर्मितीशास्त्राला इंग्रजीत “ इंजिनिअरिंग” म्हणतात त्याला शिल्पशास्त्र असे व्यापक अर्थ असलेले भारतीय नांव आहे. शिल्पशास्त्र मनुष्य जन्मापासून विकसित होत गेले. आधुनिक अभियांत्रिकी शास्त्रांत अंतर्भाव असलेली अनेक शास्त्रे प्राचीन भारतांत विद्यमान होती. भृगु ऋषींनी या शिल्पशास्त्र विषयाचे दहा उपशास्त्रे, बत्तीस विद्या व चौसष्ठ कला या मध्ये विभागणी केली. वास्तुशास्त्र हे सातवे उपशास्त्र. […]

कॉर्डलेस फोन

कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले जातात. […]

बंदूक कलाशनिकोव्हची

मातृभूमीच्या रक्षणासाठी जनरल निखाइल कलाशनिकोव्ह यांनी ज्या ‘ एके -४७ ‘ चा शोध लावला .. दुर्दैवाने ती आता अतिरेक्यांचे लाडके शस्त्र बनली आहे . या ‘ एके -४७ ‘ च्या जन्माची ही कहाणी . […]

भारतीय रेल्वे यंत्रणा बांधणीचा प्रवास

भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा… […]

महाकाय देवमासा

पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारा, सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे निळा देवमासा. मात्र या देवमाशालाही वजनाच्या बाबतीत अगदी सहजपणे मागे टाकेल, असा एक देवमासा प्राचीन काळी अस्तित्वात होता. प्राचीन काळी म्हणजे खूपच पूर्वी – सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी. हा देवमासा फक्त निळ्या देवमाशापेक्षाच वजनदार नव्हता, तर तो आतापर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वजनदार प्राणी ठरला आहे. […]

अणुभट्टीत जड पाणी कशासाठी वापरतात?

जड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ भाग 3

नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे  ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत  असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 2

विद्यापीठाचा प्रमुख भिक्षू असे. त्याला बुद्धिमता, वारिष्टता नुसार निवडले जाई. त्याच्याकडे विद्यापीठाची संपूर्ण प्राशासनिक,शैक्षणिक  सूत्रे असत. […]

1 30 31 32 33 34 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..