नवीन लेखन...

शैक्षणिक

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 1

नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम  शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले. […]

गणकयंत्र

आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली. […]

फळे आणि भाज्या उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर

फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख… […]

सुभाषित रत्नांनी – भाग १०

या भागाची सुरवात आपण पहेलिका (कोडे) असणाऱ्या श्लोकांनी करू या. ही लेखमाला इथेच संपूर्ण करू या . ह्या लेखमालेत संस्कृत सुभाषितांचे मराठी भाषान्तर केले आहे. शक्यतो कळण्यास सोपी सुभाषिते निवडायचा प्रयत्न केला आहे. सगळेच श्लोक सगळ्या लोकांना माहित असतील किंवा सर्वच श्लोक प्रसिद्ध असतील असे नाही. परंतु सामान्य लोकांना सोप्या भाषेत सांगावयाचा प्रयत्न केला आहे. […]

प्रचंड हिरा

हिरा हे आपल्याला सुपरिचित असलेलं रत्न आहे. हिरा म्हणजे प्रत्यक्षात स्फटिकाच्या स्वरूपातला कार्बन. योग्य अशा उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची परिस्थिती निर्माण झाली, की कार्बनचं हिऱ्यात रूपांतर व्हायला लागलं. अशी परिस्थिती पृथ्वीच्या कवचाखालील भागात अस्तित्वात असते. त्यामुळे पृथ्वीच्या या अंतर्भागातील कार्बनचं रूपांतर हिऱ्यांत होऊ शकतं. […]

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची अंमलबजावणी

अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भारतीय अणुभट्ट्यांपैकी बहुसंख्य अणुभट्ट्यांत इंधन म्हणून नैसर्गिक युरेनिअम वापरलं जातं. हे युरेनिअम झारखंड राज्यातल्या सिंघभूम पट्ट्यात सापडणाऱ्या खनिजांद्वारे मिळविलं जातं. […]

पर्यावरणस्नेही लाकूड!

आजच्या औद्योगिक युगातली एक महत्त्वाची गरज म्हणजे कागद. लिखाणासाठी किंवा छपाईसाठी वापरला जाणारा कागद, वेष्टणासाठी वापरला जाणारा कागद, नॅपकिन म्हणून वापरला जाणारा कागद… अशा वेगवेगळ्या स्वरूपात कागदाचा वापर केला जातो. मात्र या कागदनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान, लाकडाच्या लगद्यातील काही पदार्थ वेगळे करून काढून टाकावे लागतात. […]

भारतीय मुलूख मैदानी तोफ

सीमा संरक्षणासाठी स्वयंपूर्ण असणे कोणत्याही देशासाठी अत्यावश्यक असते. भारतही त्याला अपवाद नाही. संरक्षण संशोधन विकास संस्था आणि तिच्या अंतर्गत संस्था भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण बनविण्यात अग्रेसर आहेत. ओळख करून घेऊ ‘एटॅग्स’ या मुलूख मैदानी तोफेची…. […]

भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम

अणुइंधन म्हणून वापरता येणाऱ्या मूलद्रव्यांपैकी युरेनिअमचे आपल्याकडील साठे मर्यादित तर आहेतच, पण ते कमी प्रतीच्या खनिजाच्या स्वरूपातलेही आहेत. थोरिअम या अणुइंधनाच्या बाबतीत मात्र आपण श्रीमंत असून, थोरिअमच्या वैपुल्यानुसार भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. […]

1 31 32 33 34 35 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..