वंध्यत्व – भाग पहिला
एखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात. या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते. लग्नानंतरच्या दोन वर्षांत या जोडप्याने मूल होऊ न देण्यासाठी कोठचेही कुटुंबनियोजनाचे उपाय मात्र अमलात आणलेले नसावेत. कधी कधी गर्भधारणा होऊन नंतर […]