नवीन लेखन...

शैक्षणिक

मेद व मेदाम्ले

मागील भागात ओमेगा ३ ची माहिती दिली. ओमेगा ६ हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ओमेगा ६ हे लिनोलिनिक आम्लापासून तयार होते. मुख्यत्वे हे मधुमेहाने होणारे चेतातंतूंवरील परिणाम कमी करते. बाकी परिणाम ओमेगा ३ प्रमाणेच. भोपळ्याच्या बिया, पिस्ते, कोंबडीचे मांस, ऑलिव्ह, कपाशीच्या बिया, शेंगदाणे, करडई, तीळ, भाताचे तूस यांच्या तेलात ओमेगा ६ असते. मेदाचे पचन- तोंडातच सुरू होते. […]

वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता कशी मोजतात?

एखाद्या मोठ्या यंत्राने दहा लाख किलोग्रॅम म्हणजे एक हजार टन वजनाची वस्तू दहा सेंटीमीटर वर उचलण्यास लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती एका सेकंदात केली, तर त्या यंत्राची क्षमता दहा लाख वॅट म्हणजेच एक हजार किलोवॅट किंवा एक मेगावॅट इतकी भरेल. वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता याच मेगावॅट या एककाद्वारे मोजली जाते. […]

स्तनांचे आजार

(अ) ‘स्तनांचे आजार’ या विषयाला अगदी तान्ह्या बाळापासून सुरुवात करू. काही बाळांच्या स्तनांमधून दुधासारखा चिकट स्राव निघतो. याला चेटकिणीचं दूध-विचेस मिल्क म्हणतात; पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपोआप कमी होते. मुद्दाम स्तनांना मालिश करून हे दूध पिळून काढण्याची प्रथा अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे सूज येऊन तिथे गळू होण्याची शक्यता असते. बिचाऱ्या बाळांना त्याचा अत्यंत त्रास […]

गुडघ्याचे प्रतिरोपण केव्हा ?

आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे […]

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धती

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतीत सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरीऊर्जा, भूऊर्जा इत्यादींचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. यातील बहुतेक पद्धती या प्रदूषणापासून मुक्त आहेत. […]

अंतःस्रावी ग्रंथी (पूर्वार्ध)

ज्या ग्रंथींचा स्राव नलिकेशिवाय थेट रक्तात उतरतो अशा ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी, शरीराचे सर्व व्यवहार नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथी बारा प्रकारच्या असतात. याचे सर्व कार्य रासायनिक संकेतावर शीघ्रतेने चालते. १) पियुषी ऊर्फ पोषग्रंथी (पिच्युइटरी) कवटीच्या आतील खालच्या भागात जतूक अस्थीच्या खड्यासारख्या भागात अधोअभिवाहीमस्तिषक केंद्राखाली (हायपोथॅलॅमस) ही ग्रंथी असते. आकार वाटाण्यासारखा, रंग गुलाबी, १.३ सें. मी. आकाराची ही […]

“स्वप्नं प्रत्यक्षात उतरविणारा दुर्दम्य आशावादी” डॉ. रघुनाथ माशेलकर.

यशाच्या क्षितिजाला शेवट नसतो. माणसें स्वतःच्या कर्तुत्वाला मर्यादा घालून चौकटीत रहाणं पसंत करतात,वर्तुळात राहणं पसंत करतात ,पण वर्तुळाला छेद देऊन एखादा असामान्य उत्तुंग शिखर गाठतोच, त्यापैकी एक व्यक्तीमत्व म्हणजेच डॉ. रघुनाथ माशेलकर. […]

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पद्धती

आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते. […]

शीतपेयांचे दुष्परिणाम

आजची तरुण पिढी व लहान मुले पाण्याऐवजी कारबोनेटेड शीतपेय आवडीने पिताना दिसतात. अशा पेयात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर इतर अनेक द्रव्ये असतात. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रक्रियेसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही पाण्याची गरज इतर कोणतेही पेय भरून काढू शकत नाही. आपले शरीर पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही. म्हणून उष्मांक विरहित स्वच्छ जीवनदायी पाण्याचा […]

1 38 39 40 41 42 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..