कोपराचा सांधा
या सांध्यास एक नव्हे तर दोन सांध्यांचा अंतर्भाव होतो. दंडाचे हाड कोपराच्या बाजूला बाहुतील अलना आणि रेडियस या दोन हाडांशी मैत्री करीत कोपराचा सांधा तयार करते. यासाठी हाडाचे टोक भूमीतीतील निरनिराळ्या आकृत्यांसारखे बनविले आहे. अलना या हाडाशी महत्त्वपूर्ण सांधा बनविताना ते मोठ्या ढोलक्यासारखे दोन्ही बाजूंना रुंद व मध्ये आकुंचित पावल्यासारखे बनविले आहे. हे ढोलक्याकृती मुसळ अलना […]