नवीन लेखन...

शैक्षणिक

खोटदुखी (टाचा दुखणे)

बऱ्याच शहरवासीयांना साधारण मध्यमवयीन लोकांना विशेषतः महिलांना हल्ली खोटदुखी (टाचात दुखणे) ग्रासलेले असते. सततच्या उभे राहण्यामुळे किंवा चालण्यामुळे टाचा दुखायला लागतात. सकाळी उठल्यावर टाचा टेकविताना, खूप दुखतात किंवा बऱ्याच वेळा बसल्यानंतरही उठल्यावर टाचांवर वजन पडले, की थोडा वेळ लंगडायला होते. काही काळानंतर ती व्यक्ती न लंगडता चालू शकते; पण टाचांतील दुखणे थोड्याफार प्रमाणात राहते. आपल्या संपूर्ण […]

सुभाषित रत्नांनी – भाग ४

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात. […]

टेनिस एल्बो (कोपरदुखी)

हल्ली अनेकांना खास करून शहरात राहणाऱ्या लोकांना उजव्या कोपराच्या बाहेर दुखू लागते. निरनिराळ्या गोळ्या वारंवार घ्याव्या लागतात. डॉक्टर टेनिस एल्बोचे निदान करतात. टेनिस हा खेळ न खेळतासुद्धा मला हा रोग कसा झाला याचे रुग्णाला आश्चर्य वाटते. हे दुखणे होण्यासाठी टेनिस किंवा बॅटमिंटनच खेळायला पाहिजे असे नाही. अधिक काम असलेल्या बाजूला हे दुखणे होते म्हणजे उजवीकडे असल्यास […]

तिबेटी साप

तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं. […]

दमा-अस्थमा

अस्थमा (दमा) हा मध्यम व लहान श्वासनलिकांच्या अरुंदीकरणामुळे निर्माण झालेला दीर्घकाळ टीकणारा विकार आहे. दमा का होतो? कोणाला होतो? तो एवढा दीर्घकाळ पाठपुरावा का करतो? तो फक्त वृद्धांनाच होतो, की लहान मुलेही त्याचे शिकार होतात? दम्यावर गुणकारी उपचार आहेत का? असे अनेक प्रश्न दमेकरी व त्यांचे नातलग नेहमी विचारतात. श्वासनलिका अरुंद झाल्याने त्यातून हवा मोकळेपणाने आत-बाहेर […]

कॉरोनरी धमनीविकार- पारंपरिक अॅन्जियोग्राफी

सी. टी. अॅन्जियोग्राफीत जर कॉरोनरी धमनीत अडथळा दिसला तर पारंपरिक अॅन्जियोग्राफी करावीच लागते. पारंपरिक अॅन्जियोग्राफी ही ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ तपासणी समजली जाते. या तपासणीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. हृदरोगतज्ज्ञ स्वतः ही तपासणी करतात. या हृदीय सुशिरीकरणासाठी (अॅन्जियोग्राफी) जांघेतील ‘फिमोरल’ नावाची धमनी किंवा हातातील ‘रेडियल’ धमनी वापरतात. तेवढाच भाग बधिर करून त्या धमनीत सुई टोचून त्यातून […]

हाडांची रचना

प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच. माणसाचे हाड हा एक खास भाग आहे. […]

प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे काय अपाय होतात ?

स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. म्हणूनच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगराईचे प्रमाण वाढतच आहे. पाण्याचे प्रदूषण मुख्यतः सूक्ष्म जिवाणू आणि रासायनिक टाकाऊ पदार्थांमुळे होते. हानीकारक सूक्ष्म जिवाणूंमुळे ज्या ठिकाणी पाणी दूषित होते त्या ठिकाणी आतड्याचे रोग जसे […]

मासिक पाळी का व कशी ?

मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर एक वेगळा जीव म्हणून बाळ जगू लागते. त्याच्या शरीरातील श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था इत्यादि संस्था आपले कार्य सुरू करतात. फक्त जननसंस्था मात्र बाळ मोठे होईपर्यंत कार्यरत नसते. मुलगी मोठी होऊ लागली, की तिच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते. बाह्यात्कारी बदल आपल्या दिसतात, तसेच पोटातही बीजांडग्रंथी, गर्भाशय यांची वाढ होते. त्यासाठी तिच्या शरीरात […]

1 47 48 49 50 51 160
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..