शुभमंगल सावधान..
आमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे. […]