बेकेलाइट प्लास्टिक
प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. […]