मोटार चालवणारे आम्ल !
मोटारकारमधील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी विद्युतधारा कोठून मिळते? मोटारकारमध्ये एक विद्युतघट (बॅटरी) असतो. त्यातून मिळणाऱ्या विद्युतधारेमुळे मोटारकार सुरू होते आणि इतर विद्युत उपकरणेही चालतात. मोटारकारमधील विद्युतघटात सल्फ्युरिक आम्ल असते. त्यात शिसे (लेड) या धातूच्या पट्ट्या अर्धवट बुडालेल्या स्थितीत उभ्या असतात. दोन्हींच्या अभिक्रियेतून विद्युतधारा निर्माण होते. यामुळेच या विद्युतघटाला ‘लेड ॲसिड बॅटरी’ आणि सल्फ्युरिक आम्लास ‘बॅटरी ॲसिड’ या […]